ठक…. ठक…..ठक…. असा लयबद्ध ध्वनी आपल्याला तांबट आळीत पोहोचण्यापूर्वीच कानावर पडतो. त्या आवाजातील शांत लहरीची भावना, तिथल्या वाड्यांचं जुनंपण आणि धातूच्या पत्र्यापासून सुंदर कलाकृती उदयाला येतानाचा प्रवास आपल्याला मंत्रमुग्ध करतो. हंडा, कळशी, घंगाळ, ताम्रकलश, बंब, यांसारख्या पूर्वापार चालत आलेल्या वस्तूंची निर्मिती इथे होते. पारंपरिक कौशल्याने प्रथम धातूचा पत्रा गरम करणे (Annealing), त्यास आकार देणे (Shaping) आणि शेवटी ‘मठारकाम’ म्हणजेच पत्र्यावर एकसारखे ठोके देत त्यावर प्रमाणबध्द आणि आकर्षक असे रुप देऊन त्यास आणखी मजबूती देणे हे इथले महत्वाचे वैशिष्ट्य.
इतिहासात मागे वळून पाहताना 300–400 वर्षे जुने असे या तांबट आळीतील धातूच्या कामाचे संदर्भ मिळतात. बारा बलुतेदार सामाजिक व्यवस्थेचा भाग असणारी तांबट ही लोक कोकणातून पुण्यात आल्याचे समजते, अन् पेशवे काळात इथे पितळ आणि तांबे निर्मित कौशल्यपुर्ण वस्तूंची भरभराट सुरु झाली. त्यांची भूमिका ही पेशव्यांच्या धार्मिक, आर्थिक आणि लष्करी गरजा भागवणे ही होती. यात तांब्याची नाणी, स्वयंपाकातील व सजावटीची भांडी ते सैन्यासाठी शस्त्रे यांची तांबट यांनी निर्मिती व भारतभर व्यापारही केला. शतकानुशतके असलेला धातूंच्या भांड्यांचा वापर, त्यांची उपयुक्तता, टिकाऊपणा आणि संचित असे आरोग्यकारक साधननिर्मिती करणारे म्हणून तांबट आळीतील कारागिरांनी आपले स्थान टिकवून ठेवले असले तरी मात्र या सुंदर व तंत्रज्ञानालाही आश्चर्यचकित करणारे कारागिरांचे मानांकित कसब हे सध्या अल्पशा कारागिरांच्या हाती उरले आहे. आता ही कलात्मक परंपरा पुनरुजीवित करण्याची गरज आहे. या व्यवसायावर यांत्रिक युगाचे आक्रमण झाले असून त्याचा प्रतिकूल परिणाम जाणवत आहे. तांबे, पितळाचे वाढते दर, स्टेनलेस स्टील आणि प्लॅस्टिकचा वाढता वापर यामुळे या व्यवसायाकडे नवीन तरुण पिढीही पाठ फिरवताना दिसते. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात असणाऱ्या तांबट कुटूंबातील कारागिरांची संख्या ही आता 90% हून जास्त घटली असून आता तांबट आळीत मोजकेच कारखाने उरले आहेत.
हंडा, कळशी, पात्रे या पूर्वापार चालत आलेल्या वस्तूंबरोबरच ‘गृहसजावटीच्या कलाकृती’ (Interior Artworks) यांचीही तांबट यांनी निर्मिती सुरु केल्यास आधुनिक तंत्रज्ञानासोबत योग्य मार्गदर्शनाने हाच ऱ्हास होत चाललेला व्यवसाय नव्या जोमाने उभारी घेतल्याशिवाय राहणार नाही. कायमच अंधारात राहणारे या पारंपरिक कुशल कारागीरांना तंत्रज्ञानासोबत जाहिराती, प्रदर्शने, लेख, मुलाखत यांची गरज असून कलारसिक व सर्वसामान्यांनी पुढे येऊन पाठबळ दिल्यास नक्कीच येथील धातूकामाच्या निपुण कौशल्यांचे भविष्य आशाजनक असेल.
Images: Studiocoppre and Internet
हा लेख धातुकामाचा इतिहास व कलेबद्दलच्या काही माझ्या शैक्षणिक अभ्यासानुसार लिहिला असून यात काही त्रुटी असू शकतात. आपल्या मार्गदर्शक सूचनांचे स्वागत आहे.
धन्यवाद !!





Good Article...
उत्तर द्याहटवाGood efforts !!
उत्तर द्याहटवाKeep it up...We would like to read more.
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर माहिती मिळाली आणि ही कला पुढे चालू ठेवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे.
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती,.👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम इतिहास !
उत्तर द्याहटवाअप्रतिम इतिहास !
उत्तर द्याहटवा������
उत्तर द्याहटवाmastch dada
उत्तर द्याहटवाछान माहिती👌👍
उत्तर द्याहटवाNice writing
उत्तर द्याहटवाGreat..!
उत्तर द्याहटवाHach aapla Vaarsa!, aata kay sagle steelchich bhandi wapartat pn aamchyakade barich ashi juni bhandi aahet ghari.
उत्तर द्याहटवाNice information
उत्तर द्याहटवाखूप चांगली माहिती दिले आहे, ऋषि..!
उत्तर द्याहटवाशक्य असल्यास तेथील कारागिरांचे संपर्क क्रमांक किंवा त्यांच्या संस्थेचे संपर्क देता आले तर त्यांना संपर्क करणे सोयीचे होईल..!
बाकी लेख छान लिहिला आहे.!👍