एका फकिराने दमडया साठवून ही मशीद बांधली अशी कथा आहे आणि अहमदनगरमधल्या या मशीदीची आशियातील आदर्श दहा मशिदीमध्ये गणना होते.
दगडांवरील अप्रतिम कोरीवकाम आणि कॅलिग्रॅफिसाठी प्रसिध्द असलेली एकमेव दमडी मशीद ही भुईकोट किल्ल्यापासून बुऱ्हानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लागते. आज तिच्या स्थापत्यरचनेमुळे आशियातील आदर्श दहा मशिदींमध्ये तिची गणना होते. निजामशाहीतल्या सरदार सहेल खान ( शेर खान ) याने इ.स. १५६७ मध्ये ही मशीद बांधली. दमडी हे तेव्हाचं चलनी नाण्याचं नाव. किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी तिथे एक फकिर बसत असे, अनेक दमड्या साठवून त्यातून त्याने किल्ल्याच्या मजूरांच्या मदतीने ही मशीद बांधली. आणि तिचे नाव दमडी मशीद पडले. अशी आख्यायिका सांगतात.
या मशिदीतील विविध शैलींचा एकत्रित मिलाफ तिच्या स्थापत्यात आणखी सौंदर्यात भर पाडतो. मशिदीतील छताची व खाली फरशीची रचना जणू आरशात एकमेकांचे प्रतिबिंब उमटावे अशी एकसारखी आहे. मिनारावर तसेच दर्शनी भागात कमळाची फुले पाने रेखीव रित्या कोरलेली आहेत. आणि समोरच्या भिंतीमध्ये कुराणातील वचने, अरेबिक व पर्शियन मध्ये वेलबुट्टी सारखी नक्षी अप्रतिमरित्या कोरण्यात आली आहेत. मशिदीवरील संगमरवरी दगडावरील कॅलिग्राफिचे काम आपल्याला थक्क करुन सोडते. या मशिदीच्या आवारात एक बारव असून त्यात एक कबर आहे. परिसरातही










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा